देश- विदेशमहाराष्ट्र

दुर्दैवी घटना आईसह दोन मुलांचा मृत्यू; हत्येनंतर मृतदेह पेटवले


पुणे / प्रतिनिधी: पुणे रांजणगाव खंडाळे परिसरात मन हेलावून टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेबरोबर तिच्या दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृतदेह पुणे-आहिल्यानगर महामार्गालगत एका ग्रोव्हल कंपनीच्या मागील भागात आढळले. तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून, तिच्या उजव्या हातावर गोंदलेले असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यासोबत आढळलेली दोन मुलं ही अंदाजे चार वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची चिमुकली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या घटनेमुळे रांजणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत पुरावे गोळा केले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणाला या घटनेबाबत संशयास्पद व्यक्तीविषयी माहिती असेल, तर त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, गुन्हेगार लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button