दुग्धव्यवसाय सुरू करणार आहात? ‘या’ ४ योजना तुम्हाला देतील आर्थिक बळकटी!

दुग्धव्यवसाय हा आजच्या काळात शाश्वत उत्पन्नाचा एक विश्वासार्ह मार्ग ठरत आहे.
केंद्र सरकारने भारतातील दुग्ध उद्योगाचा विकास आणि पशुधनाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
भारतामध्ये सुमारे ३० कोटी जनावरे आहेत, त्यापैकी फक्त १० कोटी जनावरे सध्या दूध देत आहेत. तरीही, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.
जर उर्वरित २० कोटी जनावरेही वेळेवर आणि जास्त प्रमाणात दूध देऊ लागली, तर देशाचे दूध उत्पादन अनेक पटींनी वाढू शकते.
हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ अंतर्गत दुग्धव्यवसायाला चालना देणाऱ्या ४ महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.
या योजनांचा उद्देश जनावरांची गुणवत्ता सुधारणे, दूध उत्पादन वाढवणे आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे आहे.
या ४ प्रमुख योजना कोणत्या?
- कृत्रिम रेतन योजना
जनावरांच्या गुणवत्तापूर्ण पैदाशीसाठी ही योजना महत्त्वाची आहे. उच्च दर्जाचे वीर्य वापरून जनावरांची उत्पादकता वाढवली जाते. - लिंग वर्गीकरण वीर्य योजना (Sex-Sorted Semen Scheme)
ह्या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे मिळवण्यासाठी विशेष प्रकारचे वीर्य वापरण्यावर भर दिला जातो. यामुळे शेती व दुग्धव्यवसायात लागणारी मादी जनावरे वाढतात. - गोकुळ ग्राम योजना
या योजनेअंतर्गत स्थानिक वंशाच्या जनावरांचे संवर्धन, प्रजनन व व्यवस्थापनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. - ई-पशुधन मार्केट प्लॅटफॉर्म
पशुपालकांना त्यांच्या जनावरांची विक्री किंवा खरेदी ऑनलाईन करता यावी यासाठी सरकारने हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहे.
जर तुम्ही दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा जरूर घ्या.
यामुळे केवळ जनावरांची उत्पादकता नाही, तर तुमचं आर्थिक भविष्यही उज्ज्वल होऊ शकतं.