ढाका, बांगलादेश : बांगलादेश हवाई दलाच्या ताफ्यातील F-7 BGI हे लढाऊ प्रशिक्षण (Plane Crash) विमान सोमवारी ढाकाच्या उत्तर भागातील माइलस्टोन स्कूल परिसरात कोसळल्याने एक व्यक्ती ठार झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.
सैन्य जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षणासाठी रवाना झालं होतं. उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रात बिघाड निर्माण झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वैमानिकाने शेवटपर्यंत विमानाचं नियंत्रण सावरायचा प्रयत्न केला, मात्र अपघात अटळ ठरला.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा तात्पुरती रिकामी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे. (Plane Crash )
विमान दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याने हवाई दलाच्या सुरक्षाव्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.
