Petrol-Diesel Price : होळीला सामान्य जनतेला मोठा दिलासा, “या” भागात झाले स्वस्त
मुंबईत स्वस्त आणि या शहरांमध्ये महाग झाले इंधन

नवी दिल्ली: सरकारने महागाईशी संबंधित आकडेवारी जाहीर केली होती. ज्यामध्ये देशातील किरकोळ महागाई 3 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मात्र, त्याच्या एक दिवसानंतर, म्हणजेच होळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबईत स्वस्त आणि या शहरांमध्ये महाग झाले इंधन
देशातील चार महानगरांपैकी मुंबई वगळता इतर सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. नवी दिल्ली आणि चेन्नईबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 पैशांची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 87.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 92.39 रुपये प्रति लिटर झाली आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात 1.07 रुपये प्रति लिटर वाढ झाली असून, किंमत 105.01 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या दरात 1.06 रुपये प्रति लिटर वाढ झाली असून, किंमत 91.82 रुपये प्रति लिटर झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या आकडेवारीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरात 44 पैसे प्रति लिटर घट झाली असून, किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या दरात 2.12 रुपयांची घट झाली असून, किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाली आहे.
अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?
कच्च्या तेलाच्या दरात घट
दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या दरात किरकोळ घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, आखाती देशांच्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.14 पैशांनी घटून 70.85 रुपये प्रति बॅरल झाली आहे. गेल्या 2 महिन्यांत कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 14 टक्क्यांनी घट झाली आहे.