सांगोला : सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केलेल्या सदस्यांचा गौरव करण्यासाठी सांगोला येथील संघटनेच्या कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे होते. कार्यक्रमाची सुरुवात संघटनेतील दिवंगत सदस्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर शंकर सावंत, वसंतराव दिघे, प्रतिभा शेंडे, दिनकर घोडके, अभिमन्यू कांबळे, दत्तात्रय खामकर आणि रविराज शेटे या गुणी सदस्यांचा फेटा, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सत्कारमूर्ती तसेच प्रभाकर कसबे, सिद्धेश्वर झाडबुके, जयवंतराव नागणे, अरुण वाघमोडे, बापूसाहेब लवटे आणि लक्ष्मण सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या कार्याचा गौरव केला व वरिष्ठांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात संघटनेचे गंगाराम इमडे, अंबिका शिंदे, एकनाथ शिंदे, शिवाजी काशीद, महादेव चौगुले, दत्तात्रय शिंदे, मच्छिंद्र मिसाळ, शिवाजी राजमाने, दत्तात्रय शास्त्रे, तात्या काबुगडे, जालिंदर केंगार, दिगंबर गायकवाड, अरुण टेळे आणि बाबासाहेब मोठे यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजकांनी कौशल्यपूर्णपणे केले तर आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला. सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
