सोलापूरमध्ये आणखी एका तरुण डॉक्टरचे आत्महत्येचे टोकाचे पाऊल; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूरमधील डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका तरुण इंटर्न डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वैद्यकीय क्षेत्रात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण नामबियर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होता . सकाळी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडत नसल्याने सहकाऱ्यांना संशय आला. दरवाजा तोडून आत पाहिल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण व सेवेशी संबंधित ताणतणावांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना भावनिक आणि मानसिक आधार देण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.