
विशेष प्रतिनिधी : भुयारी गटारी योजनेनंतर रस्त्यांची अवस्था (Pathetic Road) अत्यंत दयनीय झाली आहे. खोदकाम होऊनही सर्व रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. पाऊस झाल्येनांतर या रस्त्यांवर चिखल व पाणी साचून राहते. चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून, नागरिकांचे कंबरडे मोडत आहेत.(Pathetic Road)
इन पब्लिक न्यूजशी बोलताना नागरिक म्हणाले, नगरपालिका यावर तोडगा कधी काढणार? आणि रस्ते कधी तयार होणार?” रस्त्यांची दुरुस्ती न करता, माध्यमांतून बातमी आल्यानंतर रस्त्यावर खडी टाकून औपचारिकता पूर्ण केली जात आहे असा आरोप करण्यात आला आहे. या खडीवरून तर लोक घसरून पडावेत, असेच नगरपालिकेला वाटते की काय? असा सवाल नागरिक करत आहेत.(Pathetic Road)
काही प्रस्थापित व्यक्तींनी “लोकांनी कंबरडे मोडून घ्या मोडा, पण कुणाला काही बोलू नका” असे वक्तव्य केले होते याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Pathetic Road)
लवकरच रस्त्यांची दुरुस्ती होणार : मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले…
इन पब्लिक न्यूजशी बोलताना मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले, आम्ही सर्व रस्त्यांची जातीनिहाय पाहणी केली आहे. तसेच जे नागरिक माहिती देतील त्या-त्या भागात रस्ते करण्यात लवकरात लवकर कामे सुरु करण्यात येतील. नगरपालिका यावर लवकरच तोडगा काढून सर्व रस्ते पूर्ण करणार असल्याची माहिती इन पब्लिक न्यूजशी बोलताना दिली. (Pathetic Road)