महाराष्ट्र

Panhala Fort : शिवरायांचे विचार,त्यांचे पराक्रम यांची आठवण ठेवावी : आमदार डॉ. विनय कोरे

भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राज्यव्यापी "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे आयोजन पन्हाळा गडावर करण्यात आले


कोल्हापूर/राजू मुजावर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राज्यव्यापी “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन पन्हाळा गडावर करण्यात आले. या भव्य पदयात्रेत आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी सहभागी होत शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

या पदयात्रेचे उद्दिष्ट शिवरायांच्या शौर्याला उजाळा देणे, देशभक्ती व नेतृत्वगुणांचा प्रचार करणे, सुशासनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्वदेशी भावनेचा प्रचार करणे असे होते. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत ही पदयात्रा दिमाखात पार पडली. 

कार्यक्रमास आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, सारथी संस्थेचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर** यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात : विकास पोपळे,आगार व्यवस्थापक

यावेळी शिवप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विविध सरकारी विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने या पदयात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. 

शिवरायांचे विचार आणि त्यांचे पराक्रम यांची आठवण ठेवत ही पदयात्रा ऐतिहासिक पन्हाळा गडावर शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button