महाराष्ट्र

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये समिती स्थापन करण्याचे आवाहन


सोलापूर / प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयाने Writ pition civil १२२४/२०१७ मध्ये सदर अधिनियमाच्या अमलबजावणी बाबत राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act मधील कलम ४ अन्वये ज्या आस्थापना मध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील आशा सर्व खाजगी अस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

त्याकरीता सर्व खाजगी अस्थापनाना आवाहन करण्यात येते की, १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा खाजगी आस्थापनांनी महिला व बाल विकासाच्या SHE BOX PORTAL(HTTPS://SHEBOX. WCD.GOV.IN/) वर जाऊन अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापनेबाबत नोंद करावी.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम २०१३ अन्वये समिती स्थापन न केल्यास ५० हजार रुपये पर्यंत दंड केला जाईल याची नोंद घ्यावी.

तसेच सदर समिती गठीत करण्याबाबत अथवा कायदयाबाबत अधिकची माहिती पाहिजे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शोभानगर, बिगबाजाराच्या पाठीमागे, सातरस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button