पंढरपूर एस.के.एन. सिंहगडमधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास भेट झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
आउट कम बेस्ड एज्युकेशन या शिक्षण प्रणालीवर आधारित सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. जलशुद्धीकरण प्रक्रिया सांडपाणी प्रक्रिया हे स्थापत्य अभियांत्रिकी मधील दोन महत्त्वाचे विषय.
क्रमिक अभ्यासामध्ये हे दोन्हीही विशेष शिकवले जातात. वास्तविक प्रकल्पात या प्रक्रिया, प्रक्रियेसाठी वापरले जाणारे वेगवेगळे घटक, त्यांना दिला जाणारा वेळ इत्यादी गोष्टीची माहिती अशा भेटीद्वारे सहज समजून जातात.
जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया त्यासाठीचे क्षेत्र, पाण्याचा स्रोत, आणि शुद्ध झालेले पाणी शहरातील प्रत्येक घरांमध्ये पोहोचवणे या मुख्य प्रक्रिया.
तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या ठिकाणहून दूषित पाणी जमा करणे जसे की औद्योगिक क्षेत्र, घरगुती क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र इत्यादी आणि अशा दूषित पाण्यावरती प्रक्रिया केली जाते.
पंढरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्र तसेच गोपाळपूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणी ही भेट आयोजित करण्यात आली होती. ही
औद्योगिक भेट स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरली.
विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, श्री चंद्रकांत देशमुख, श्री अजित करांडे, श्री शेखर पाटील तसेच विभागातील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या औद्योगिक भेटीसाठी विशेष परिश्रम घेतले.