गायक वैभव केंगार यांच्या स्वरांनी ‘शाम-ए-ग़ज़ल’ ने पंढरपूरकर मंत्रमुग्ध
अद्वितीय संगीतमय मैफिलीने पंढरपूरच्या रसिकांना स्वरमय अनुभव दिला

पंढरपूर/महेश लांडगे : प्रसिद्ध गजल गायक स्वर्गीय जगजीत सिंग यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून पंढरपूर पंचक्रोशीतील सोनके गावचे सुप्रसिद्ध गायक वैभव केंगार यांनी ‘शाम-ए-ग़ज़ल’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले. या अद्वितीय संगीतमय मैफिलीने पंढरपूरच्या रसिकांना स्वरमय अनुभव दिला.

कार्यक्रमाची सुरुवात जगजीत सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यासाठी भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, माधुरी जोशी, ज्ञानेश्वर दुधाणे, धनंजय मनमाडकर आणि भक्ती रत्नपारखी यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
गझलांचा सुरेल प्रवाह
वैभव केंगार यांनी जगजीत सिंग यांच्या अजरामर गजलांचे सादरीकरण करत रसिकांना मोहून टाकले. कार्यक्रमात गाजलेल्या गजलांचा समावेश होता :
- – प्यार का पहला खत
- – होठों से छू लो तुम
- – झुकी झुकी सी नजर
- – कोई फरियाद
- – होश वालों को खबर क्या
- – चिठ्ठी ना कोई संदेस

या सुरेल मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक गझल संपताच ‘वन्स मोअर’च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. शेवटी आपको देखकर या गझलेने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला उंचीवर नेण्याचे काम अत्यंत प्रतिभावान वादकांनी केले.
- – तबला : रोहन पंढरपूरकर
- – सिंथेसायझर : अविनाश इनामदार
- – व्हायोलिन : केदार गुळवणी
- – इक्टोपॅड : विनोद सावंत
- – ढोलक : माऊली खरात
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
या शानदार मैफिलीच्या यशासाठी मनमाडकर परिवाराचे मोठे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी समर्थपणे पार पाडले.

कार्यक्रमाला उपस्थित राहून परिश्रम घेतलेल्या मान्यवरांमध्ये भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, धनंजय मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे, डॉ. मिलिंद जोशी, माधुरी जोशी, शिवराज पंडीत, राम अनवते, मनोज व्हरगर, सतीश गेजगे, महेश पारसे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाने पुढे आणखी जोमाने गझल साधना करण्याची ऊर्जा मिळाल्याचे गायक वैभव केंगार यांनी सांगितले.
