
Pandharpur
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी यात्रेसाठी (Pandharpur) प्रशासनाने कंबर कसली आहे. लाखो वारकरी भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालखी तळ, भक्तीसागर (65 एकर), चंद्रभागा वाळवंट, पत्राशेड आणि नवीन बसस्थानक परिसराची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शौचालये, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर समितीमार्फत भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. नवीन बसस्थानकाजवळ पोलिस प्रशासनाच्या एकात्मिक नियंत्रण कक्षाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना दिल्या.(Pandharpur )
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी प्रशासनाच्या उपाययोजनांची (Pandharpur) माहिती दिली तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिराच्या जतन-संवर्धनाचा आराखडा सादर केला. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आरोग्य सुविधा, अतिक्रमण मोहिम, शुद्ध पाणीपुरवठा आणि प्रकाश व्यवस्थेचा लेखाजोखा दिला.
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सीईओ कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.