अक्षय्य तृतीयेला ‘या’ ७ वस्तू घरात ठेवू नका; लक्ष्मी देवींचा होईल कोप!
या ७ वस्तू अक्षय्य तृतीयेला घरात ठेवू नयेत

विशेष वृत्त : पंचांगानुसार अक्षय्य तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरी केली जाणारी ही तिथी कोणत्याही शुभ कार्यासाठी ‘अबूझ मुहूर्त’ म्हणजेच कोणतीही पंचांग किंवा मुहूर्त न पाहता कोणतीही खरेदी किंवा नवी सुरुवात करण्यासाठी आदर्श मानली जाते.
या दिवशी सोने, घर, गाडी, जमीन किंवा अन्य मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु, या शुभ दिवशी घरात काही अशुभ वस्तू असल्यास तुमच्या सौख्य, समृद्धी आणि लक्ष्मीच्या कृपेला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला घरातील काही वस्तू तातडीने काढून टाकणे अत्यंत गरजेचे आहे.
जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेला या ७ वस्तू घरात ठेवू नयेत :
1. बंद/थांबलेली घड्याळे
थांबलेली किंवा बंद घड्याळे वेळेच्या अडथळ्याचं प्रतिक मानली जातात. ही अडकलेली वेळ आपल्या आयुष्यात प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरू शकते. अशा घड्याळांना घरातून काढून टाकावे.
2. फाटलेले किंवा घाणेरडे कपडे
जुने, फाटलेले किंवा धुवायचे राहिलेले कपडे घरात ठेवल्यास ते गरीबी आणि दुर्दैवाचे संकेत मानले जातात. विशेषतः या दिवशी असे कपडे घरात असणे शुभ मानले जात नाही.
3. सुकलेली झाडे आणि फुले
कोमेजलेली फुले आणि वाळलेली झाडे नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानली जातात. अशा झाडांचा साठा घरात असल्यास ती गरिबीचे दार उघडू शकते. त्याऐवजी ताजी फुले व झाडे घरात ठेवा.
4. तुटलेला झाडू
झाडू ही लक्ष्मी देवीशी संबंधित वस्तू आहे. तुटलेला किंवा वापरात नसलेला झाडू घरात ठेवणे धनहानीचे संकेत मानले जाते. या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते.
5. तुटलेली चप्पल, बूट
तुटलेल्या चपला किंवा बूट घरात ठेवल्यास अराजकता आणि नकारात्मकता वाढते. असे शूज वापरणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं. या वस्तू त्वरित घरातून काढून टाका.
6. निरुपयोगी वस्तू
ज्या वस्तूंचा तुम्ही वापर करत नाही अशा निरुपयोगी वस्तू, तुटकी भांडी, जुने इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा बेकार साहित्य घरात ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. घरात अनावश्यक वस्तू न ठेवता त्या काढून टाका.
फुटलेली/तुटलेली मूर्ती किंवा देवप्रतिमा :
देवाच्या तुटलेल्या किंवा तडे गेलेल्या मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा मूर्तींना पवित्र पाण्यात विसर्जित करून घरात केवळ संपूर्ण, स्वच्छ आणि पूजायोग्य मूर्ती ठेवा.
अक्षय्य तृतीयेला घरात स्वच्छता करणे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, आणि या अशुभ वस्तू घराबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी आणि सुख-शांतीचे वातावरण तयार होते.