Pahalgam Terror Attack: सांगोला पोलीस स्टेशनकडून अचानक शहरात नाकाबंदी! पो.नि.विनोद घुगे यांची मोठी कारवाई

सांगोला/विशेष प्रतिनिधी : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये देशातील २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
तसेच, सांगोला तालुक्यातील ८ पर्यटक जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. परंतु हल्ल्याच्या ठिकाणापासून ते सर्वजण ३० किलोमीटर अंतरावर होते. यामुळेच ते सुखरूप असून सांगोल्याला येण्यासाठी ते झेलम एक्सप्रेसने रवाना झाल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
दरम्यान, सांगोला पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पो.नि.विनोद घुगे, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा फौज फाटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एसटी स्टँड परिसर, वासुद चौक येथे याच पार्श्वभूमीवर सांगोल्यात काल अचानक नाकाबंदी करण्यात आली. यावेळी गाड्यांची कसून तपासणी व चौकशी करण्यात आली. यावेळी जवळपास वीस वाहनांवर कारवाई करत १७ हजार ५०० रुपयांचा दंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडून आकारण्यात आला. या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पो.नि.विनोद घुगे नुकतेच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यातच दहशतवादी हल्ला झाला. या घटनेचे गांभीर्य पाहता पो.नि.विनोद घुगे व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी शहरात मोठे पाऊल उचलले आहे.