दिल्ली/प्रतिनिधी : पाकिस्तानी नागरिकांना आता SAARC व्हिसा अंतर्गत प्रवासाची परवानगी काढून घेण्यात आली आहे. सर्व जारी केलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
भारताने दिल्लीतील पाक उच्चायुक्त कार्यालयातील डिफेन्स, नेव्ही आणि एअर अॅडव्हायझर्सना देशातून हाकलले आहे. भारतदेखील इस्लामाबादमधून आपले लष्करी सल्लागार परत बोलावणार आहे. दोन्ही देशांतून प्रत्येकी ५ सहायक कर्मचाऱ्यांनाही हटवले आहेत.
परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली की, राजनयिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. दोन्ही उच्चायुक्त कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर आणली जाईल. हा निर्णय १ मे २०२५ पासून लागू होईल.
