Operation Sindoor Updates : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सक्सेसफूल; घरात घुसून पाकिस्तानला धुतले

Army Operation In Pakistan After Pahalgam Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. दहशतवादी हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. भरताच्या गुप्तचर यंत्रणेकडून हल्ला दहशतवाद्यांची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा थेट संबंध आहे. किंबहुना पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे असे विक्रम मिसरी यांनी माध्यमांना बोलताना माहिती दिली.
#WATCH | Delhi | #OperationSindoor| Col. Sofiya Qureshi, while addressing the media, presents videos showing destroyed terror camps, including from the Muridke where those involved in the 2008 Mumbai Terror attacks – Ajmal Kasab and David Headley received their training…" pic.twitter.com/tNpsDf92Wu
— ANI (@ANI) May 7, 2025
Operation Sindoor : भारतीय लष्करानं पाकिस्तानचं फायटर जेट JF-17चा केला खात्मा ; चीनने दिलेले ‘गिफ्ट’ लढाऊ विमानचा चक्काचूर
Operation Sindoor: भारतीय लष्करानं (Indian Army) पाकिस्तानातील (Pakistan) तब्बल 9 दहशतवादी तळांवर (Terrorist Base) हल्ला केला. पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिल आहे. पण त्यासोबतच पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांनाही भारताने न्याय दिला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतरही (India Air Strike 9 Terror Bases In Pakistan) पाकिस्तानने कुरापती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भारतीय लष्कर सोडणार नाही. भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत माघारी धाडलंय.
पुलवामा हल्ल्यासह इतर हल्ल्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ठिकाणांना भारतीय सैन्याने केलं उद्ध्वस्त
Operation Sindoor : जम्मू पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने “ऑपरेशन सिंदूर” राबवले. आज (बुधवारी) मध्यरात्री १.२८ च्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली.
भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. 1971च्या युद्धानंतर भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
#WATCH | #OperationSindoor | Terror site Markaz Subhan Allah, Bahawalpur, Pakistan, the headquarters of Jaish-e-Mohammed, targeted by Indian Armed Forces." pic.twitter.com/iM4s91ktb8
— ANI (@ANI) May 7, 2025