महाराष्ट्र

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू


सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 20 एप्रिल 2025  ते 04 मे 2025 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी  याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील,

त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात.

आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button