
सोलापूर / प्रतिनिधी : जून 2025 पासून इ. 11 वी कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेशाची व्याप्ती राज्यस्तरीय वाढविण्याच्या दृष्टीने इ.11 वी चे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार आहेत. सदर प्रवेशासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांची माहिती घेण्याचे काम चालू आहे.
याबाबत पुणे विभागाच्या सहाय्यक शिक्षण उपसंचलाक ज्योती परिहार यांनी जिल्हयातील सर्व प्राचार्याची व्हि सी घेऊन, माहिती देण्यात आली. सर्व मुळ कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता, तुकडी मान्यता.
माहिती घेण्याचे काम चालू असून पुढील ऑनलाईन काम पुणे विभागातर्फे चालू आहे. तरी सर्व पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक ते सर्व दाखले सेतू कार्यालयातून तात्काळ काढून घ्यावेत म्हणजे ऑनलाईन प्रवेश घेताना आपणांस माहिती भरणे सोयीस्कर होईल.
ऑनलाईन प्रवेशासंदर्भात पालकांना कोणतीही अडचण येऊ नये अथवा आलेल्या अडचणीं तात्काळ निवारण करण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी दिली आहे.