
पंढरपूर/हेमा हिरासकर:एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथे दि. १२ मार्च २०२५ रोजी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.ही कार्यशाळा मंगळाचा पृष्ठभाग आणि वातावरण या विषयावरती आय. आय. आर. एस. इस्रो मार्फत आयोजित करण्यात आली होती.
सिंहगड महाविद्यालयात ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली डिझाइनचे’ चर्चासत्र
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर हे आय. आय. आर. एस. इस्रो चे नोडल सेंटर आहे. या नोडल सेंटर द्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षकांनी मंगळ पृष्ठभागावरील स्तर आणि वातावरण याविषयी सविस्तर विश्लेषण केले. मंगळ ग्रहाचे भूशास्त्र हा प्रमुख विषय या कार्यशाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.
एक दिवसीय ही कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यामध्ये विविध वैज्ञानिक उपक्रम मोहिमांद्वारे मंगळाच्या शोधावर आणि त्यांच्या महत्त्वाच्या निष्कर्षावर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक नोडल सेंटर प्रमुख श्री. मिलिंद तोंडसे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.