पंढरपूर सिहंगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर/प्रतिनिधी : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा काँक्रीट मिक्स डिझाईन या विषयावरती स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना आणि पुणे कन्स्ट्रक्शन अभियांत्रिकी संशोधन संस्था, पुणे यांच्या मार्फत द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून सांगली येथील वसुधा असोसिएट्स चे श्री. व्ही. एस. शेरेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा घायाळ हिने केले आणि प्रस्तावना डॉ. श्रीगणेश कदम यांनी केले. त्यानंतर विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शेरेकर यांचे स्वागत केले.
” काँक्रीट बनविण्याची आय. एस. पद्धती आणि ए. सी. आय. पद्धती” हा प्रमुख विषय या कार्यशाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. काँक्रीट तयार करण्यासाठीच्या पद्धती आणि मटेरियलची गुणवत्ता तपासण्यासाठीच्या पद्धतींचे मुलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने श्री. शेरेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमासाठी डॉ. चेतन पिसे (डीन आर अँड डी), डॉ. यशवंत पवार (डीन, पदव्युत्तर अभ्यासक्रम), प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, डॉ. सत्यवान जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेचे समन्वयक प्रमुख प्रा.अजित करांडे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.