आओ सुनाओ प्यार की एक कहानी..! ४४ वर्षाच्या तरुणीने २६ वर्षाच्या तरुणाशी ‘लव्ह यू’ म्हणत केले लग्न!

विशेष प्रतिनिधी : “असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं”. प्रेमात पडलेला माणूस मग वय, समाज किंवा नियम यांची फिकीर करत नाही. काहीसं असंच घडलं एका ४४ वर्षीय महिलेच्या बाबतीत, जिनं आपल्या मुलाच्या १८ वर्षांनी लहान असलेल्या मित्रावरच प्रेम केलं आणि थेट त्याच्याशी लग्न करून नवा संसार सुरू केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तान्या नावाच्या या महिलेला जोसू नावाच्या २६ वर्षीय तरुणावर प्रेम झालं. जोसूला ती पहिल्यांदा भेटली तेव्हा तो फक्त १९ वर्षांचा होता. तो तिच्या दोन मुलांचा मित्र होता. तान्या सांगते की, “तो घरी आला की, मला पाहून अचंबित व्हायचा. त्याच्या मते, ती चार मुलांची आई वाटत नव्हती.
तान्याचं असंही म्हणणं आहे की, जोसू जेव्हा २१ वर्षांचा झाला, तेव्हा ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले आणि त्याने स्वतःहून सर्व निर्णय घेतले. त्यामुळे हे नातं चुकीचं नसल्याचं ती ठामपणे सांगते.
विशेष म्हणजे, जोसू आणि तान्याचे मुलं यांच्यात आजही पूर्वीसारखेच संबंध आहेत. ते एकत्र मस्ती करतात, वेळ घालवतात. या जोडीने नुकतंच एका चॅनेलवर येऊन त्यांची प्रेमकहाणी शेअर केली असून, आता ते दोघं एकत्र मिळून कुटुंब वाढवण्याच्या विचारात आहेत.