
विशेष वृत्त : गुजरातमधील वडोदरा (Gujarat) जिल्ह्यात महिसागर नदीवरचा पूल कोसळला. दुर्घटनेच्या वेळी पुलावरून वाहने जात होती. पूल तुटल्यामुळे दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी एकूण पाच वाहने थेट नदीत कोसळली. एक टँकर पुलाच्या तुटलेल्या भागावर अडकले.
या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, (Gujarat) तर 8 जणांना स्थानिकांनी वेळीच वाचवले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन टीम्स बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.
Bharat Bandh : भारत बंदची हाक; 25 कोटी कामगार रस्त्यावर, पाहा काय बंद काय सुरु!
हा पूल सुमारे 45 वर्ष जुना असूनमध्य गुजरातला (Gujarat) सौराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग होता. पूल कोसळल्यामुळे भरूच, सूरत, नवसारी, तापी आणि वलसाडसारख्या दक्षिण गुजरातमधील शहरांचा सौराष्ट्रशी थेट संपर्क तुटला आहे. आता या भागांना अहमदाबादमार्गे लांबचा फेरमार्ग वापरावा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹2 लाखांची आणि जखमींना 50,000 ची मदत जाहीर केली आहे.
अपघात घडल्यानंतर तातडीने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. एका स्थानिक तरुणाने सांगितले, (Gujarat) “आम्ही सकाळपासूनच बचावकार्य करत आहोत. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहेत, त्यात एक लहान मूल आहे. आणखी एक मूल अद्याप बेपत्ता आहे. या काळात प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही.”

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या 45 वर्ष जुन्या पुलाची डागडुजी करण्याबाबत प्रशासनाला वारंवार सांगितले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, त्यामुळेच आज ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या अपघाताला संपूर्णपणे प्रशासनाला जबाबदार धरले आहे.