सरकारी शिक्षक होण्यासाठी बीएडची गरज नाही, जाणून घ्या नवीन कोर्स

नवी दिल्ली / प्रतिनिधी: सरकारी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. आता बीएडची पदवी घेणे बंधनकारक राहणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत मोठा बदल करण्यात आला असून बीएड कोर्सच्या जागी एक नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे.
यापूर्वी शिक्षक होण्यासाठी बीएड पदवी आवश्यक होती. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात ही अट हटवण्यात आली असून, त्याऐवजी ‘इंटीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम’ (ITEP) नावाचा चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
ITEP म्हणजे काय?
ITEP हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, जो 12वी नंतर थेट करता येतो. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य यासारख्या शाखांबरोबरच शिक्षक प्रशिक्षणाचीही तयारी केली जाते. यामुळे बीएडसाठी स्वतंत्रपणे दोन वर्षे खर्च करण्याची गरज नाही.
या कोर्सचे फायदे:
- वेळ आणि पैशांची बचत
- एकाच कोर्समध्ये विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्ये
- शिक्षक म्हणून थेट पात्रता
- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) आणि UGCची मान्यता
NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असून, अध्यापन पद्धतीपासून पात्रतेच्या निकषांपर्यंत सर्व गोष्टी नव्याने ठरवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे बीएड ऐवजी ITEP कोर्सची अंमलबजावणी.
ज्यांना सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी आता ITEP कोर्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या देशातील निवडक शिक्षण संस्थांमध्ये हा कोर्स सुरू करण्यात आला असून, पुढील काही वर्षांत तो देशभर लागू केला जाणार आहे.