सांगोल्याचे ग्रामदैवत श्री. अंबिकादेवी यात्रेला ३० जानेवारीपासून होणार सुरुवात..!
यंदा हे असणार नवीन!

सांगोला, महेश लांडगे : सांगोल्याची ग्रामदैवत श्री. अंबिकादेवीच्या यात्रेला ३० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा भक्तांसाठी खास असते आणि यंदा यात्रेत काही नवे उपक्रम राबवले जाणार आहेत. यात्रेची सुरुवात मंदिरातील विशेष पूजा-अर्चनेने होते.
यंदा यात्रेत नवीन काय?
- प्रदर्शन व मेळावे : स्थानिक उत्पादने, हस्तकला, आणि शेतमालाच्या विक्रीसाठी प्रदर्शन आणि व्यवसाय प्रोत्साहन मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
- स्वच्छता मोहिम: यात्रेच्या दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असून, प्लास्टिकमुक्त यात्रेसाठी जनजागृती केली जाणार आहे.
- सांस्कृतिक कार्यक्रम : यात्रेच्या वेळी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
- विविध स्पर्धा : विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा, जंगी कुस्त्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- दारू गोळा आणि आतिषबाजी : यंदाच्या वर्षी सर्वाना विशेष दारू गोळा आणि आतिषबाजी पहायला मिळणार आहे.
दरम्यान, पोलिस बंदोबस्त, पार्किंगची व्यवस्था, आणि आरोग्य सेवा यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे.
श्री. अंबिकादेवीच्या भक्तांसाठी ही यात्रा आध्यात्मिक अनुभव देण्याबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जोपासणारी आहे.
मा.जिल्हा न्यायाधिशसो, पंढरपूर यांनी दिनांक २४ जानेवारी रोजी श्री. अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसीव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील, अॅड. विक्रांत प्रकाश बनकर, अॅड. विशालदीप विजयसिंह बाबर, अॅड. नितीन गुलाबराव बाबर, अॅड.सौ.शशिकला सुधीर खाडे, अॅड. महेंद्र मारुती पत्की यांची नेमणूक केली आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक २८ जानेवारी व बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी जागा वाटप सकाळी ११.३० ते २.०० व दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत करण्यात येणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे.