
Ashadhi Wari
सांगोला : संपूर्ण महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र पंढरपूरमध्ये आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात. (Ashadhi Wari) सांगोला महाविद्यालयासमोरून देखील अनेक दिंड्या पंढरपूरला जात असतात.
सांगोला महाविद्यालय सांगोला, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आषाढी वारी-२०२५, (Ashadhi Wari) “स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी” २०२५ या उपक्रमंतार्गत वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील स्वयंसेवक /स्वयंसेविका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा समजून वारकऱ्यांची सेवा केली. या मोहीम मध्ये महाविद्यालयामध्ये आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सोबत चहापानची व्यवस्था करण्यात आलेली होती.
तसेच दिंडी थांबलेल्या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. केळीच्या साली, प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा संकलन केले गेले. सदरील कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,कार्यालयीन अधीक्षक श्री.विलास माने, डॉ.राम पवार, कॅप्टन संतोष कांबळे, प्रा.वासुदेव वालेकर, डॉ.नवनाथ शिंदे, डॉ.मालोजी जगताप, प्रा.संतोष लोंढे,डॉ.मच्छिंद्र वेदपाठक, डॉ.महेश घाडगे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव देवकर व डॉ. रेणुकाचार्य खानापुरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.