
Natalia Serhienko 67 year old retiree Kiev said Zelensky protecting Ukraine interests
सहदेव खांडेकर : व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांच्यात जोरदार वादावादी झाली. जेलेंस्की व्हाइट हाऊसमधून बाहेर पडताच युक्रेनचे लोक आपल्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या समर्थनात पुढे आले आहेत. जेलेंस्कींना देशाच्या हिताची रक्षा करणारा म्हटलं आहे. सोबतच युरोपातील अनेक देशांनी जेलेंस्कीच समर्थन केलय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेंस यांनी जेलेंस्की यांना काही तिखट प्रश्न विचारले. त्यावेळी जेलेंस्की थोडे अडचणीत आले.
या घटनेने रशियाला नक्कीच आनंद झाला असणार. अमेरिका आणि जेलेंस्कीचे संबंध संपले या दृष्टीने रशिया या घटनेकडे पाहत असणार. जेलेंस्की आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची जनता जेलेंस्की यांच्यासोबत आहे. जेलेंस्की यांनी देशाची प्रतिमा आणि हितासाठी आवाज उठवलाय असं ते म्हणाले.
ट्रम्प आणि जेलेंस्कीमधील वादावादीनंतर इतके देश युक्रेनच्या समर्थनात पुढे आले आहेत
स्लोवेनिया,बेल्जियम,आयरलँड,ऑस्ट्रिया,कॅनडा,रोमानिया,क्रोएशिया,फिनलँड,एस्तोनिया,लातविया,नेदरलँड,फ्रान्स,लक्समबर्ग,पोर्तगाल,स्वीडन,जर्मनी,नॉर्वे,चेक रिपब्लिक,लिथुआनिया,मोलदोवा,स्पेन,पोलँड,यूके,ईयू ब्लॉक.
जेलेंस्की वाघासारखे लढले. जेलेंस्की युक्रेनच्या हिताची रक्षा करत आहेत असं कीवमधील सेवानिवृत्त 67 वर्षीय नतालिया सेरहिएन्को म्हणाले. शुक्रवारी रात्री युक्रेनमधील दुसरं मोठ शहर खारकीववर दोन ड्रोन हल्ले झाले. ओलेह सिनीहुबोव यांनी जेलेंस्की यांचं कौतुक केलं. भविष्यात रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेनला सुरक्षा मिळाली पाहिजे. त्या आश्वासनाशिवाय कुठलाही शांती करार करायचा नाही, यावर जेलेंस्की ठाम आहेत, असं सिनीहुबोव म्हणाले.
‘अमेरिकेने अनादर केला’ ?
“आमचा नेता दबाव असताना सुद्धा युक्रेन जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी ठाम आहे, आम्हाला सुरक्षेची गॅरेंटी आणि न्यायपूर्ण शांतता हवी आहे” असं सिनीहुबोव म्हणाले. कीवचे निवासी 37 वर्षीय आर्टेम वसीलीव म्हणाले की, “ओव्हल ऑफिसमधील चर्चेचा अमेरिकेने अनादर केला. आम्ही आमची लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. रशिया विरुद्ध उभा राहणारा युक्रेन पहिला देश आहे”.