Nano Banana Trend
विशेष प्रतिनिधी : नॅनो बनाना ट्रेंड जबरदस्त व्हायरल होत आहे. जिथे लोक आपले फोटो अपलोड करून AI च्या मदतीने थ्रीडी आणि हायपर-रियलिस्टिक इमेजेस तयार करून घेत आहेत. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. सुरुवातीला गोंडस आणि मजेशीर वाटणारा हा ट्रेंड प्रत्यक्षात मात्र मोठ्या धोक्याचे कारण ठरू शकतो.
IPS अधिकाऱ्यांची इशारा-वार्ता
IPS अधिकारी वीसी सज्जनार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या ट्रेंडबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, इंटरनेटवरील असे नवे ट्रेंड्स आकर्षक वाटतात. मात्र ‘नॅनो बनाना’ सारख्या ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी नकली वेबसाईट्स किंवा अनऑथराईज्ड अॅप्सवर आपले फोटो आणि वैयक्तिक माहिती शेअर करणे अतिशय धोकादायक आहे. फक्त एका क्लिकमुळे तुमचे बँक अकाउंटही रिकामे होऊ शकते.
डेटा प्रायव्हसी सर्वात महत्त्वाची
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करणे चुकीचे नाही. पण सुरक्षा नेहमीच पहिली प्राथमिकता असायला हवी. एकदा तुमचा डेटा फेक वेबसाईट्स किंवा संशयास्पद अॅप्सवर गेला, तर तो परत मिळवणे जवळपास अशक्य होते.
इन पब्लिक न्यूजकडून नागरिकांना आवाहन :
अनओळखी मार्गावर पाऊल टाकले तर खड्ड्यात पडणे नक्की आहे,
फोटो किंवा वैयक्तिक माहिती अपलोड करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
तुमचा डेटा, तुमचे पैसे आणि तुमची जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
हा व्हायरल होत असलेला ट्रेंड गोंडस वाटत असला तरी त्यामागे मोठा सायबर फसवणुकीचा धोका दडलेला आहे.
