महाराष्ट्र

मुख्यमंत्री वयोश्री योजना : आधार अपडेटसाठी सोलापूरमध्ये शिबिराचे आयोजन


सोलापूर/प्रतिनिधी :  ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य उपकरणांचा लाभ देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत सोलापूरमध्ये २४ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे भरवले जाणार आहे.

१५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे आधार अपडेट नाहीत

सोलापूर जिल्ह्यातील १५,७१६ लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर योजना लाभ वितरित होऊ शकलेला नाही. यामुळे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, संबंधित लाभार्थ्यांनी आधार कार्डसह कार्यालयीन वेळेत शिबिर स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश काय?

“मुख्यमंत्री वयोश्री योजना” ही ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अशक्तपणा, अपंगत्व यावर मात करण्यासाठी सहाय्य उपकरणे, योगोपचार, आणि मानसिक आरोग्य सल्ला उपलब्ध करून दिला जातो. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे स्वावलंबन आणि जीवनमान सुधारण्यावर भर दिला जातो.

लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निश्चित कालावधीत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
– समाजकल्याण विभाग, सोलापूर


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button