विशेष प्रतिनिधी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकतंच केलंले बोल्ड फोटोशूट, ज्यात तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवालीने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जाळीमागे उभी असल्याची दिसत आहे .

‘मुझे बस तुमसे प्यार है’ या कॅप्शनसह शेअर केलेल्या या फोटोंमुळे तिचा लूक अधिकच आकर्षक ठरत आहे.ही तिची पहिलीच वेळ आहे जिथे ती इतक्या बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. या लूकमुळे ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

केवळ अभिनयातच नव्हे, तर सोशल मीडियावरही शिवाली परब एक सक्रिय आणि लोकप्रिय इन्फ्लुएंसर म्हणून ओळखली जाते.नुकताच तिला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अंबर भरारी आणि डॉ. श्रीकांत फाउंडेशन यांच्याकडून ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

शिवालीने आपल्या करिअरची सुरुवात २०१४ मध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठीवरील शोमधून केली होती. आज ती अभिनय, सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं उत्तम मिश्रण मानली जाते.

