मुंबई / प्रतिनिधी: छोट्या पडद्यावरून बॉलीवूडपर्यंत झेप घेणारी आणि आपल्या सौंदर्य, अभिनय आणि स्टाईलने सर्वांना भुरळ घालणारी मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या सिझलिंग व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओमध्ये मौनीने काळ्या रंगाचा डीप नेक वनपीस गाऊन परिधान केला असून, तिच्या किलर अदा आणि डौलदार स्टाईलने चाहत्यांच्या हृदयात थेट एंट्री घेतली आहे. व्हिडिओत ती हातात गुलाबाचे फूल घेऊन एकाहून एक हॉट पोज देताना दिसत आहे. गडद मेकअप आणि सॉफ्ट कर्ल्स असलेले केस तिच्या लूकमध्ये अजूनच ग्लॅमरची भर टाकतात.
नेटिझन्सनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी , “सौंदर्याचं जिवंत रूप” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सतत सोशल मीडियावर सक्रिय
मौनी रॉय केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस अदा यासाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याची झलक नेहमीच पाहायला मिळते.
टीव्हीवरील ‘नागिन’ या हिट मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मौनी आता बॉलिवूडमध्येही आपली ओळख भक्कमपणे निर्माण करत आहे. तिच्या स्टाईलने आणि आत्मविश्वासाने अनेक नवोदित अभिनेत्रींसाठी ती फॅशन आयकॉन बनली आहे.
व्हिडिओ पाहिलात का अजून? मौनीच्या ‘क्लासी आणि बोल्ड’ अंदाजाने सोशल मीडियावर उडवली धुराळा!
