तासगाव / प्रतिनिधी: आई आणि बहिणीने मिळून पोटच्या मुलाचा/भावाचा खून करून मृतदेह जाळण्याचा संतापजनक प्रकार तासगावच्या पेठेत घडला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आईने आणि बहीण यांनी मिळून मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी दोघींना अटक केली असून या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शनिवारी ३ मे सकाळी साडेसातच्या सुमारास मुलगा झोपेत असताना आई आणि बहिणीने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. नंतर मृतदेह कापडात गुंडाळून त्यावर कागदी पुठ्ठे टाकण्यात आले. अंगावर कापूर टाकून मृतदेह पेटवण्यात आला. त्यानंतर ११२ नंबरवर कॉल करून ‘आग लागून मृत्यू’ झाल्याचा बनाव करण्यात आला . मात्र, पोलिसांनी काही तासांतच खऱ्या प्रकरणचा छडा लावला.
भडका उडवणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून आईकडून अशा प्रकारे मुलाचा खून केल्याने अनेकांना हादरा बसला आहे. पोलिस अधिक तपास करत असून मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील पुरावे तपासले जात आहेत.
