
सांगोला / प्रतिनिधी: नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत केंब्रिज विद्यालयाचा 100% निकाल लागला असून डोके नैतिक तातेराव हा विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आला आहे.
अतिशय कष्ट आणि जिद्दीतून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या रेवती गव्हाणे मॅडम, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
आजपर्यंत केलेल्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यामुळे माझ्या मुलाला शंभर टक्के गुण मिळाले असे मत नैतिक चे वडील डोके सर यांनी व्यक्त केले.
डोके सर मागील पंधरा वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करत असून आपल्या कार्याचे हे फलित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.