देश- विदेशसांगोला

सांगोल्याचा ‘ढाण्या वाघ मा.आमदार शहाजीबापू पाटील’ “डिजिटल मीडिया” पत्रकारांसाठी मैदानात

"डिजिटल मीडिया पत्रकार (Digital Media) संघटनेला सरकारदरबारी सहकार्याचे आश्वासन : मा. आमदार शहाजीबापू पाटील


विशेष प्रतिनिधी : “डिजिटल मीडियाचा(Digital Media) विस्तार हा काळाची गरज आहे, आणि डिजिटल पत्रकार संघटना ही त्यासाठीचा मजबूत मंच आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे त्यांच्या कार्यलयात संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी यांचा (Digital Media) सत्कार आयोजित समारंभात प्रतिपादन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या(Digital Media) अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करू. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेतील पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन मा.आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.  (Digital Media)

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतील (Digital Media) सांगोला तालुक्यातील नूतन पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांचा जनसंपर्क कार्यालयमध्ये माजी लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पत्रकार क्षेत्रातील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, सदानंद पांढरे, रविराज शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.  (Digital Media)

यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे (Digital Media) नूतन अध्यक्ष दिपक ऐवळे, नूतन महिला अध्यक्षा दीक्षा चंदनशिवे, उपाध्यक्ष कैलास गोरे, उपाध्यक्ष जगन्नाथ साठे, कार्याध्यक्ष दशरथ बाबर, खजिनदार रोहित हेगडे यांच्यासह कार्यकारणी सदस्य शशिकांत बनसोडे, नितीन होवाळ, करण मोरे, स्वप्निल करडे, शब्बीर मुलाणी, चंद्रशेखर केंगार, अमोल महानवर आदी उपस्थित होते. तसेच अंबादास कदम ,अनिल येडगे, अतुल भडंगे आदी उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button