
Minister Radhakrishna Vikhe Patil MLA Dr Babasaheb Deshmukh
मुंबई/सहदेव खांडेकर : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानभवनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील माण नदीवरील ११ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
११ बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज
माण नदीवरील पुरामुळे या ११ बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचेकडून शासनाकडे पाठवण्यात आल आहे. परंतु अद्याप मंजुरी न मिळाल्याने दुष्काळी भागातील जलसंधारणावर परिणाम झाला आहे.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध द्यावी अशी मागणी केली आहे.
जलसंपदा मंत्र्यांनी दिली सकारात्मक ग्वाही
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी यावेळी लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली.
या निधीमुळे सांगोला तालुक्यातील पाणी साठवण क्षमता वाढून, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.