
मुंबई : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे (Legislative Assembly) आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी विधानसभेत आपल्या मतदारसंघाच्या विकासाशी संबंधित अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला. सांगोला शहर आणि तालुक्यातील जनतेच्या रोजच्या अडचणी, विकासकामांची रखडलेली गती आणि प्रशासनाची उदासीनता यावर त्यांनी सविस्तर चर्चा करत शासनाकडे ठोस मागण्या मांडल्या.
सभागृहात (Legislative Assembly) सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, सांगोला शहरात सध्या भुयारी गटारीचे काम सुरू आहे. या कामामुळे अंतर्गत रस्ते पूर्णपणे उखडले गेले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या रस्त्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, सांगोला नगरपालिकेला दरवर्षी साधारण ३ कोटींचा निधी नालेसफाई, कचरा संकलन आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी दिला जातो. वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा विस्तार लक्षात घेता हा निधी वाढवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. (Legislative Assembly)
Tesla : टेस्लाची एंट्री मुंबईत पहिले शोरूम; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
सांगोला शहरातील ट्रामा सेंटरची इमारत पूर्ण असून ती बंद पडलेली आहे. आवश्यक पदे भरून तिथे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ नेमावेत आणि आवश्यक साधनसामुग्री देऊन हे ट्रामा सेंटर तातडीने सुरू करावे, असा मुद्दा त्यांनी ठणकावला.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या खोल्या मोडकळीस आल्याची बाब अधोरेखित करत त्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेअंतर्गत प्रस्तावित गावांना बांधकामासाठी तातडीने निधी द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Legislative Assembly)
रत्नागिरी ते नागपूर (NH-166) राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवला आहे. या कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशीही त्यांनी जोरदार मागणी केली.
याशिवाय, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्ष बागांना मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे ते म्हणाले.
तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणे, २०२५ च्या लोकसंख्येनुसार शहरी आणि ग्रामीण ईष्टांक मंजूर करून नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देणे, तसेच सांगोला शहरातील नगर आणि संजय नगर झोपडपट्टीतील ३०० कुटुंबांना संरक्षित झोपड्या म्हणून घोषित करून सर्व शासकीय सुविधा द्याव्यात, अशीही त्यांनी मागणी केली.
शेवटी, बौद्ध समाजाची ‘लॉर्डस बुद्धा युनिव्हर्सिटी’ स्थापनेची दीर्घकालीन मागणी मान्य करून त्या दृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावीत, असा ठाम आग्रह आमदार देशमुख यांनी सभागृहात धरला.