
सांगोला/महेश लांडगे : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. दत्तात्रय भरणेमामा यांचा आज सांगोला तालुका दौऱ्यावर आहेत. शुक्रवार 31 जानेवारी रोजी दुपारी २.०० वा. इंदापूर जि. पुणे येथून शिवणे ता. सांगोला येथून दुपारी ३.०० वा. महूद चौक येथे आगमन होणार असून तेथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आजोजित केला आहे.
तसेच, दुपारी ३.१५ वा. शिवणे ता. सांगोला येथे आगमन आणि शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे सत्कार समारंभ. दुपारी ३.३० वा. कमलापूर इथे रिसॉर्ट भूमिपूजन सोहळा व सत्कार समारंभ आयोजित केला आहे. दुपारी ३.४५ वा सांगोला येथून आरेवाडी ता. कवठेमंकाळ येथून अर्जुन चौक कोळा ता. सांगोला येथे भव्य सत्कार असून इथून आटपाडी जि. सांगलीकडे प्रयाण करणार असल्याची माहिती परमेश्वर कोळेकर यांनी दिले.