उन्हाळ्यात घटतंय दूध उत्पादन ? ‘हे’ करा आणि वाढवा
उन्हाळ्यातील योग्य काळजीमुळे जनावरांचे आरोग्य सुधारते

उन्हाळा सुरू होताच उष्णतेचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही जाणवतो. विशेषतः दूध उत्पादक जनावरांवर याचा मोठा परिणाम होतो. तापमान वाढल्याने जनावरांची चयापचय प्रक्रिया मंदावते, ते आळशी होतात आणि दूध उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात त्यांच्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन
जनावरांना थंड आणि सावलीत ठेवणे आवश्यक आहे. शक्य असल्यास झाडांची सावली किंवा जाळी वापरावी.
गोठ्यात वायुवीजन चांगले राहील याची काळजी घ्यावी, गरज असल्यास पंखा किंवा कूलरचा वापर करावा.
सकाळच्या वेळी हिरवा चारा अधिक प्रमाणात द्यावा. हिरवा मका, वैरण आणि लसूण हा आहार फायदेशीर ठरतो.
हिरव्या चार्यासोबत वाळलेला चारा समप्रमाणात द्यावा, जेणेकरून पोषण संतुलित राहील.
जनावरांना भरपूर स्वच्छ पाणी द्यावे.
रेशीम शेतीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल : उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर
दूध उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना
गाई आणि म्हशींना दररोज किमान 60 ते 80 लिटर पाणी आवश्यक असते.
पाण्यात 50 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम मिनरल मिक्सर आणि 100-150 ग्रॅम गूळ मिसळल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते.
दररोज 50 ग्रॅम मिनरल मिक्सर आणि 50 ग्रॅम मीठ आहारात मिसळून दिल्यास दूधाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढते.
निर्जलीकरणाचा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी द्यावे.
जनावरांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त काळजी
गोठ्याच्या छपरावर पाणी मारावे किंवा थंडावा देणारे शेड बसवावे.
शक्य असल्यास दुपारी चारापाणी देणे टाळावे आणि फक्त सकाळ-संध्याकाळच चारा द्यावा.
जनावरांना ताप, तहान जास्त लागणे किंवा आहारात घट होणे यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यातील योग्य काळजीमुळे जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादन वाढते, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते. त्यामुळे या हंगामात त्यांच्या पोषणाचा आणि निवाऱ्याचा विशेष विचार करणे आवश्यक आहे.