सांगोला : सांगोला-मेडशिंगी रोडवर भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची रोकड व मोबाईल असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २ मार्च) दुपारी सुमारे १२.४५ च्या सुमारास मेडशिंगी परिसरातून वसुलीची रक्कम घेऊन फायनान्स कर्मचाऱ्यारी Sangola येथील कार्यालयाकडे मोटारसायकलवरून निघाले होते.
मेडशिंगी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोटारसायकल अचानक बंद पडल्याने त्यांनी ती रस्त्याच्या कडेला उभी केली. बॅग मोटारसायकलच्या टाकीवर ठेवून इंजिन तपासत असताना मागून आलेल्या अज्ञात इसमाने संधी साधून बॅग चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात ३४,८०६ रुपये रोख रक्कम व २५,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ५९,८०६ रुपयांचा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी Sangola Police Station येथे गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
