
MHT CET
इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) 2025 साठीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सेलने जाहीर केले आहे. महा सीईटी परीक्षा 16 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे आणि 27 एप्रिल 2025 रोजी संपणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार या तारखा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आणि आवश्यकतेनुसार यात बदल होऊ शकतो, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्य परीक्षा वेळापत्रक :
पीसीबी ग्रुपसाठी: 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 (10 व 14 एप्रिल वगळून).
पीसीएम ग्रुपसाठी: 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 (24 एप्रिल वगळून).
प्रमुख परीक्षांचे तपशील:
एमएड सीईटी: 16 मार्च 2025
एमबीए/एमएमएस सीईटी : 17, 18, 19 मार्च 2025
एलएलबी 3 वर्षे सीईटी: 20 आणि 21 मार्च 2025
एमसीए सीईटी : 23 मार्च 2025
बीएड (सामान्य आणि विशेष) सीईटी: 24, 25, 26 मार्च 2025
बीपीएड सीईटी : 27 मार्च 2025
एमएचएमसीटी सीईटी : 27 मार्च 2025
बीएचएमसीटी सीईटी : 28 मार्च 2025
बीए-बीएड/बीएससी-बीएड (चार वर्षांचा अभ्यासक्रम): 28 मार्च 2025
बी डिझाइन सीईटी : 29 मार्च 2025
बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस सीईटी: 1-3 एप्रिल 2025
एलएलबी 5 वर्षे सीईटी : 4 एप्रिल 2025
एमएच नर्सिंग सीईटी : 7 आणि 8 एप्रिल 2025
एमएचटी सीईटी (पीसीबी) : 9-17 एप्रिल 2025
एमएचटी सीईटी (पीसीएम): 19-27 एप्रिल 2025
महा सीईटी :
महा सीईटी ही महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे, जी महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलद्वारे घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी एकदाच होते आणि पात्र उमेदवारांना राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.