रविराज शेटे/नाझरे : आज हिंदू समाज जाती-जातीत वाटला गेला आहे व तो संघटित होत नाही व त्यामुळे शक्ती वाढत नाही तर श्रीधर स्वामी, संजीवा स्वामी व आराध्य दैवत वीरभद्र मंदिरात हिंदू संमेलन होत आहे खरे परंतु यंत्राने, मंत्राने गोष्ट होत नाही ती तंत्राने होते व यासाठी सर्व हिंदू बांधवांनी संघटित होऊन संमेलन घेणे गरजेचे आहे असे डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी आशीर्वाचनात हिंदू संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी वीरभद्र मंदिर नाझरे येथे सांगितले.
आपण ज्या मंदिरात आहोत त्या देवाची आरती प्रथम घ्या व नंतर हनुमंताची आरती घ्या कारण हनुमान लग्ना अगोदर व नंतरही मुलांना मुलींना दर्शन घेण्यास क्रमप्राप्त आहे त्यासाठी हनुमंताला शरण जावा कारण बलशाली देवता आहे व बल हवे असेल तर हनुमानाची भक्ती करा परंतु सध्या आई-बाप, देव, गुरु कळेना व वडिलांना वर्धा आश्रमात ठेवतात तर असे करू नका. स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपतींनी सर्व जाती-धर्माचे मावळे गोळा करून लढा उभा केला व त्याप्रमाणे हिंदूंच्या सर्व जाती-धर्मांनी एकत्र येऊन गावासाठी, महाराष्ट्रासाठी व देशासाठी काम करणे गरजेचे आहे असेही महास्वामिनी सांगितले.
सुरुवातीस भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजनन केले तसेच प्रास्ताविक शिक्षक बापू पाटील यांनी केले. सध्या समाजात डॉक्टरांनी मुलांना डॉक्टर केले परंतु त्या डॉक्टरांना वर्धाश्रमात राहावे लागत आहे व यासाठी भक्त पुंडलिकांचा आदर्श घ्या, त्यांना देवासाठी वेळ नव्हता परंतु आई-वडिलांच्या सेवेसाठी वेळ होता तसेच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी, आजोबा, वडील, आई, मुले, चुलते, चुलती यांचा संवाद होत होता परंतु मोबाईल मुळे संपत चालला आहे तरी एकत्र राहून हिंदू संस्कार व संस्कृती प्रत्येक कुटुंबाने जपणे गरजेचे आहे संघाच्या संस्कारामुळे आज देशात मोठे मोठे आहेत व संग हा देशाच्या हितासाठी काम करीत आहे व हिंदू समाज ताठ मानेने जगला पाहिजे व यासाठी हे हिंदू संमेलन आहे असे प्रेरणादायी विचार डॉक्टर सचिन लादे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
हिंदू होणे भाग्याचे परंतु कट्टर होणे सौभाग्याचे आहे..
हिंदू म्हणून वावरताना आपण मूल्ये जपली पाहिजेत व मोबाईल मुळे कुटुंबातील हरवत चाललेला संवाद जपणे गरजेचे असून, जातिभेद न मानता बंधुता जपणे गरजेचे आहे व आदर्श कुटुंब पद्धती करून आदर्श गाव, जिल्हा, राज्य व देश घडवा तसेच हिंदू होणे भाग्याचे आहे परंतु कट्टर होणे हे सौभाग्याचे आहे.
अपर्णाताई साळुंखे अध्यक्ष आनंदी बहुउद्देशीय संस्था. सदर प्रसंगी जि प शिक्षण व आरोग्य सभापती चेतन सिंह केदार सावंत, उपसभापती अजय सरगर, महिला, युवक, हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सचिन पाटील यांनी तर आभार अध्यक्ष विनोद देशपांडे यांनी मानले.
