
सांगोला, विशेष प्रतिनिधी : मिरज-महूद जुना बायपास रोडवरील इन पब्लिक न्यूज कार्यालयाच्या पाठीमागे, रेल्वे स्टेशनजवळील साई लाईट हाऊसच्या शेजारी असलेल्या झाडीमध्ये आज दुपारी भीषण आग लागली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्यानंतर पेटती सिगारेट झाडीत टाकली.
ऊन आणि उष्णतेमुळे सिगारेटचा निखारा झाडांमध्ये भडकला आणि काही क्षणांतच परिसरात आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग झपाट्याने आसपास पसरू लागली.
घटनेची माहिती साई लाईट हाऊसचे मालक विकास पिसे यांनी वेळेवर अग्निशामक दलाला दिली.
अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. विकास पिसे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.