शैक्षणिक
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात शहीद दिन साजरा
"भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची प्रेरणा घेऊन एनसीसी स्वयंसेवकांनी क्रांती घडवावी."

सांगोला/स्वप्नील सासणे : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत नियोजित व नियोजित समिती तसेच राष्ट्रीय छात्र सेना यांचे मार्फत २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली निधीसाठी मागणी
अखंड हिंदुस्तानास इंग्रजांपासून मुक्ती मिळावी या हेतूने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी दिलेला इंग्रजा विरोधातील लढा हा इतिहास वाचत असताना अंगावर शहारे आणणारा असून एनसीसी स्वयंसेवकांनी प्रेरणा घ्यावी आणि प्रेरित होऊन क्रांती घडवावी, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. रिटे यांनी त्यांच्या मनोगत मध्ये व्यक्त केले.