Live-in-Relationship
विशेष प्रतिनिधी : एका सरकारी कर्मचाऱ्याने धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. पहिली पत्नी असतानाही, संबंधित कर्मचाऱ्याने दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केल्याचा आरोप करण्यात आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्याने या आरोपांना बेबुनियाद म्हणत स्पष्टीकरण दिले आहे की, तो लग्नात नसून लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे असे त्याने पोलिसांना माहिती दिली.
पत्नीने याबाबत पोलिसात तक्रार दिली. यांनतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील सिंचन विभागात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आकाश सिंह आपल्या पहिल्या पत्नीला फसवून दुसऱ्या महिलेबरोबर संबंध ठेवत असल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
लिव-इनचा दावा :
रानीखेत येथील सिंचन विभागातील या अधिकाऱ्याविरुद्ध पत्नीला फसवून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असला तरी, अधिकारी आकाश सिंह यांनी दुसरे लग्न केले नसून आपण लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा केला आहे.
