महाराष्ट्रआरोग्यसांगोला
“इन पब्लिक न्यूज” बातमी इम्पॅक्ट

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरात भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. काही भागात हे काम पूर्ण झाले असून तेथील रस्ते आणि प्रचंड धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सांगोला नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराच्या बातम्या, फोटो, व्हिडिओसह बातम्या “इन पब्लिक न्यूज”ने प्रसिद्ध केल्या होत्या.
सांगोला प्रदूषणाच्या विळख्यात : नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
सत्य परिस्थिती झाकून, अफवा सांगून नगरपालिकेकडून नागरीकांची शुद्ध फसवणूक!
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा इम्पॅक्ट हा सांगोला नगरपालिकेकडून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे ३ वेळा शहरातील अनेक भागात पाण्याच्या टँकरने फवारणी केली जाते. यामुळे शहरातील धुळीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे तसेच नागरिकांना याचा त्रास कमी झाला आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत, त्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर यांना संपर्क साधून अनेक भागात पाणी फवारण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांना होणाऱ्या त्रास, वस्तुस्थितीला पांघरूण घालण्याचे काम!