
अहिल्यानगर : सध्या सोशल मीडियावर ‘मुलूख मैदान तोफ’ संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत – ही तोफ कुठे तयार झाली? सध्या कुठे आहे? यासंदर्भात आम्ही माहिती घेतली आणि हा ऐतिहासिक वारसा उलगडण्याचा प्रयत्न केला.
तोफ कोठे तयार झाली?
रूमीखान दख्खनी, जो निजामशाहीच्या काळातील एक महत्त्वाचा सरदार होता, त्याने ही तोफ अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) येथे ओतली होती. त्या काळात अहमदनगर हे १५व्या शतकातील महत्त्वाचे लष्करी केंद्र होते.
सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान
सध्या ही तोफ कुठे आहे?
सध्या ही ऐतिहासिक तोफ विजापूरच्या बुरुजावर विराजमान आहे.
या तोफेचे खरे नाव काय?
ही तोफ ‘मुलूख मैदान तोफ’ म्हणून ओळखली जात असली तरी तिचे खरे नाव ‘मलिक-ए-मैदान’ असे आहे, अशी माहिती अहिल्यानगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते भैरवनाथ वाकळे यांनी दिली.
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ऐतिहासिक माहिती:
प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या मते,
ही तोफ अहमदनगरच्या लोहार कट्ट्यावर तयार झाली.
प्रारंभी ती परांडा किल्ल्यावर ठेवली होती.
पुढे मुरार जगदेवने शेकडो बैलांच्या मदतीने ती विजापूरला नेली आणि १६३०च्या सुमारास आदिलशहांना अर्पण केली.विश्वास पाटील यांनी आपल्या “महासम्राट झंझावात” कादंबरीत या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे.
ही तोफ आजही इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभी आहे आणि तिच्या भव्यतेमुळे ऐतिहासिक प्रेमींना आकर्षित करतआहे.