मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Mumbai Morcha ) यांनी आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहिले असून परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.(Manoj Jarange Patil Mumbai Morcha )
उपोषणामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वच ठिकाणी रस्त्यांवर प्रचंड कोंडी झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तांचीही मोठी गर्दी असल्याने वाहतुकीच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे.(Manoj Jarange Patil Mumbai Morcha )
दरम्यान, सरकारने (Manoj Jarange Patil Mumbai Morcha ) या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिले असून आज सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेतून आंदोलनाला तोडगा निघावा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Mumbai Morcha ) यांचे हे उपोषण निर्णायक ठरेल का, आणि सरकारकडून काय भूमिका मांडली जाते याची उत्सुकता संपूर्ण राज्यात लागून राहिली आहे.
मुंबईत घुमला मनोज जरांगे पाटील यांचा आवाज : (Manoj Jarange Patil Mumbai Morcha )
मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई आझाद मैदानात उपोषण सुरू!
उपोषणस्थळी मराठा आंदोलकांची मोठी गर्दी!
वाहतुकीवर मोठा परिणाम; दक्षिण मुंबईत कोंडी!
सरकारचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार!
