Manoj Jarange Patil
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज सकाळी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात उपोषण सुरू करताच त्यांनी आपल्या समर्थकांना शिस्त आणि संयम पाळण्याचे कठोर आवाहन केले. आंदोलकांची प्रचंड गर्दी असतानाही कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.(Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे यांनी स्पष्ट संदेश देत सांगितले, (Manoj Jarange Patil) कोणीही जाळपोळ करायची नाही, दगडफेक करायची नाही. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हालायचं नाही. (Manoj Jarange Patil)
