
Manisha Rani
मुंबई : अभिनेत्री मनिषा रानी (Manisha Rani) सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘झलक दिखला जा 11’ जिंकल्यानंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. सध्या ती ‘हाल-ए-दिल’ या आगामी वेब सिरीजबद्दल चर्चेत आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या व्हिडिओज आणि फोटोंद्वारे ती सतत चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
(Manisha Rani) पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. ऑफ-शोल्डर थाई-हाय स्लिट गाऊन घालून तिने दिलेल्या अदा प्रेक्षकांना घायाळ करत आहेत. फोटोमध्ये तिने आपल्या कर्वी फिगरचं आकर्षकपणे प्रदर्शन केलं आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलं आहे. “खरंच माझ्या डोळ्यात बघत आहात का?”
मनिषा रानीचे (Manisha Rani) हे फोटो चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका फॅनने लिहिलं “मानसूनमध्ये उकाडा.” दुसऱ्याने म्हटलं “तुम्ही खूपच सुंदर दिसता.” आणखी एका चाहत्याने लिहिलं “ईस्ट ऑर वेस्ट रानी इज बेस्ट.” तर एक फॅन म्हणतो “काय मस्त अदाएं आहेत.”
मनिषा रानीचे हे नवे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या स्टाइल, कॉन्फिडन्स आणि ग्लॅमरने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
मनिषा रानीबद्दल (Manisha Rani) सांगायचं झालं, तर 28 वर्षांची ही अभिनेत्री ‘झलक दिखला जा 11’ ची विजेती राहिली आहे. याशिवाय ती ओटीटीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये देखील सहभागी झाली होती आणि दुसरी रनर-अप ठरली होती. तिने ‘हिप हॉप इंडिया सीजन 2’ हा डान्स रिअॅलिटी शो देखील होस्ट केला होता. तसेच, ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली आहे.
अशाच मनोरंजनविश्वातील ताज्या अपडेट्ससाठी पाहा “IN Public News”