
मुंबई : राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेषतः पुणे शिक्षक मतदारसंघावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत तगडी रस्सीखेच सुरु आहे.(Mangesh Chivte)
महाविकास आघाडीकडून जयंत तासगावकर यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असे संकेत आहेत. याउलट महायुतीकडून भाजपच्या पारंपरिक दाव्याला शिवसेना शिंदे गटाकडून कडवे आव्हान दिले जात आहे. मंगेश चिवटे (Mangesh Chivte) या ठिकाणासाठी उभे राहत असल्याचे सांगितले जात आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांनी जिल्हानिहाय दौरे, शिक्षक संघटनांशी संवाद आणि संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. शिक्षक आंदोलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली प्रतिमा, शिक्षकांसाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक लोकप्रियता यावर उमेदवारांची निवड ठरणार असल्याने प्रत्येकजण आता पासूनच आपली घडी बसवण्याच्या तयारीत आहे.
येत्या काही महिन्यांत महायुतीतील जागा वाटप निश्चित होईल आणि त्यावरूनच मंगेश चिवटे यांना पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळतो का, हे स्पष्ट होईल. दरम्यान, शिक्षक समुदायानेही नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी मागणी सुरुवात केली असल्याचे संकेत मिळाले आहेत. (Mangesh Chivte)