देश- विदेशसांगोला

अवैध जनावर वाहतुकीप्रकरणी ६ आरोपी जेरबंद; ३ वाहने ,३२ जनावरे जप्त


सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुक्यात अवैध जनावर वाहतुकीवर मोठी कारवाई करत सांगोला पोलिसांनी तीन प्रकरणांमध्ये एकूण ६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ३ वाहने व ३२ जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १७, १९ आणि २१ मे २०२५ रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी केली. पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.

दिनांक १७/०५/२०२५
मौजे वाकी घेरडी (ता. सांगोला) येथे महिंद्रा बुलेरो पिकअप (MH-03-CD-0513) मधून अवैध जनावरांची वाहतूक करताना सचिन कांबळे व रंगनाथ लक्ष्मण सकट हे आरोपी आढळले.

दिनांक १९/०५/२०२५
सांगोला गाव शिवारातील सांगोला–सोलापूर रोडवर, पंढरपूर ब्रिजजवळ आयशर टेम्पो (MH-51-C-0639) मधून जनावरे नेत असताना शरद धोंडिराम लाटने (रा. कोल्हापूर) या आरोपीला अटक.

दिनांक २१/०५/२०२५
माळेवाडी (अलेगाव–वाकीचेरडी रोड) येथे अशोक लेलँड चारचाकी वाहन (MH-11-CH-7436) मध्ये दोन अज्ञात आरोपींनी जनावरांची अमानुषरीत्या वाहतूक करताना पोलिसांना सापडले.

पोलिसांनी एकूण ३२ लहान-मोठी जनावरे (जर्शी गाई, म्हशीचे रेडके, वासरं) दाटीवाटीने कोंडलेली, चारा-पाणी न देता, वैद्यकीय प्रमाणपत्रांशिवाय वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न केले.

या प्रकरणी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960, पशु संरक्षण अधिनियम 1976 आणि पशुवाहतूक अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हे (गु.र. नं. 418/2025, 434/2025, 438/2025) दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी, अप. पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, तसेच पोनि. विनोद घुगे (सांगोला पोलिस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या पथकात पोसई विनायक माहूरकर, पोसई हणमंत हिप्परकर, पोहेकॉ. घुले, पोना व्यवहारे, पोकॉ. कुलकर्णी, देसाई, भोई, नदाफ व कांबळे यांचा समावेश होता.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button